TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंदोलनात गुन्हा केल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही; नितीशकुमार सरकारचा अजब निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) बिहार पोलिसांनी काढलेलं एक फर्मान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. बिहारमध्ये जर कुणी आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं किंवा आंदोलन केलं तर नागरिकांवर मोठी नामुष्की ओढावू शकते. आणि या आंदोलनात त्याच्या हातून काही गुन्हा घडल्यास त्याला सरकारी नोकरी किंवा कंत्राट मिळणार नाही, असा अजब निर्णय नितीश कुमार सरकारने मंगळवारी घेतला आहे.

राज्यात कुणी सरकार विरोधात निदर्शनं केली तर पोलिसांकडून अशा व्यक्तीच्या चारित्र्य प्रमाणपत्रात नकारात्मक शेरा दिला जाणार आहे. बिहार पोलिसांच्या या लेटर बॉम्बमुळे बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी नितीशकुमार सरकारला घेरले आहे. बिहारच्या पोलीस महासंचालकाने १ फेब्रुवारी २०२१ रोजी हे पत्र जारी केलं आहे. एखादा व्यक्ती विरोध प्रदर्शन करत असेल, रास्ता रोको करत असेल आणि त्यावेळी त्याने काही गुन्हा केल्यास आणि पोलिसांनी हा गुन्हा सिद्ध केल्यास त्याच्या चारित्र्याच्या प्रमाणपत्रात त्याचा स्पष्टपणे उल्लेख केला जाईल. अशा व्यक्तीला नंतर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल. कारण या व्यक्तीला पुढे सरकारी नोकरी किंवा सरकारी कंत्राटे देण्यात येणार नाहीत, असं या पत्रात म्हटलं आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) एसके सिंघल यांच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या आदेशात सरकारी कंत्राट, सरकारी नोकरी, हत्यार बाळगण्याचा परवाना आणि पासपोर्टसाठी नागरिकांना पोलिसांकडून सत्य पडताळणी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. राज्यात सरकार विरोधी निदर्शनं आणि आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यामुळे पोलीस ठाण्यात एखाद्याविरोधात चार्जशिट दाखल झाली असेल तर त्या व्यक्तीच्या सत्य पडताळणी प्रमाणपत्रात त्याच्याविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

बिहार पोलिसांच्या या नव्या आदेशानुसार राज्यातील कोणताही व्यक्ती जर विधी व्यवस्थेचं नुकसान, निदर्शनं, चक्काजाम, रास्तारोको इत्यादी घटनांमध्ये सामील होऊन कोणत्याही गुन्ह्याला कारणीभूत ठरला असेल आणि त्याविरोधात पोलीस ठाण्यात आरोप पत्र दाखल करण्यात आलं असेल तर याचा उल्लेख संबंधित व्यक्तीच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात केला जाणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तींना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. या आदेशामुळे सरकार विरोधी निदर्शनं करणाऱ्यांविरोधात जर गुन्हा दाखल झाला तर अशांना सरकारी नोकरी किंवा कोणतंही सरकारी काम मिळू शकणार नाही.

दरम्यान, नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत २० मुद्द्यांच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नितीश मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे बिहारमध्ये सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना ५० हजार आणि इंटर पास अविवाहित विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळाने कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय नोकरीच्या नियुक्तीमध्ये मुदतवाढ दिली आहे. तसेच त्यांच्या ६० वर्षे नोकरीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. परंतु यात बेल्ट्रॉनच्या कर्मचार्‍यांचा समावेश नाही अर्थात बेल्ट्रॉनचे कर्मचारी आउटसोर्सिंग म्हणून गणले जातील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

खळबळजनक : शस्त्राच्या धाकावर जळगावात धाडसी दरोडा ; २३ लाखांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मान्सून आला रे आला ! अंदमानात पावसाला सुरुवात ; जाणून घ्या… महाराष्ट्रात कधी?

May 16, 2022

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १२ एप्रिल २०२२ !

April 12, 2022

नाशिकमध्ये १४ वर्षीय मुलीचे अपहरण आणि परराज्यात विक्री ; टोळी पोलिसांच्या ताब्यात

August 3, 2022

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताच्या प्रयत्नांना यश

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group