चिपळूण (वृत्तसंस्था) माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही, पोलीस पथक निघाले, अटक होणार, नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला, शिवसेना कोण, एखाद्या नेत्याचं नाव सांगा, कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही, माझी बदनामी कराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.
मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं राणे म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली आहेत, हे त्यांना त्यांच्या सेक्रेटरीला विचारावे लागते. मी तिथे असतो, तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत युवा सेनेच्या वतीने आंदोलन पुकारले आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की, मी माहितीच्या अधिकाऱ्याने उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याचं मला माहित नाही. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालेला नाही. अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.