पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील टिटवी येथील १६ वर्षीय तरुणीला गावातील एका तरुनाने लग्नाची मागणी करत, बळजबरीने फोटो काढले होते. ते फोटो दुसऱ्याने व्हायरल केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध ७ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, टिटवी येथील गणेश दादा चव्हाण (वय २०) हा तरुण नेहमी एका अल्पवयीन तरुणीच्या मागे फिरून लग्नाची मागणी घालत होता. तरुणीने नकार दिल्याने तो धमकी देत होता. दरम्यान, २७ फेब्रुवारीला तरुणी आपल्या मैत्रीणीच्या घरी जात असताना, गणेशने पाठलाग करत तरुणीच्या मैत्रिणीच्या घरात तिला बळजबरीने पकडले आणि तिच्यासोबत फोटो काढले. एवढेच नव्हे तर, तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी फोटो व्हायरल करेल. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ३ रोजी संशयिताने फोटो व्हायरल केले. घाबरलेल्या तरुणीने झालेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार सोमवारी पारोळा पोलिसांत गणेश चव्हाण व किरण पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि नीलेश गायकवाड करत आहेत.
















