जळगाव (प्रतिनिधी) आपल्या जगण्यातले सर्वात सुंदर आणि आनंदाचे दिवस कुठले असतील तर ते शालेय जीवनातच अनुभवायला मिळत असतात आणि याच जीवनानुभवाचा आनंद घ्यायचा असेल तर कोणत्याही वयात आपल्या शालेय जीवनातल्या मित्रांना भेटा त्यांच्याशी संवाद साधा आणि व्यक्त होऊन मनाचा हलकेपणा अलगद जोपासा असे उद्गार सार्वजनिक विद्यालयाच्या१९९९_ २००० या शैक्षणिक वर्षाच्या माजी विद्या र्थ्यांच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल
महाजन होते या प्रसंगी माजी शिक्षक ससा विद्यालय संस्थेचे चेअरमन डी. यु. भोळे यांनी मित्रत्वाची अनुभूती आपल्या दैनंदिन जीवनात देखील महत्त्वाची असते यासाठी आपल्या सगळ्यांनी ऋणानुबंधही जोपासण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी या प्रसंगी मांडले. विचार मंचावर संस्थेचे सचिव विलास चौधरी, संचालक गोपाळ भोळे, सुनील चौधरी, रत्नाकर महाजन, दिलीप अत्तरदे, डी.जी.महाजन, मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, एस. के. राणे राजपूत, गोपाळ महाजन उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेविषयी समाजाविषयी, कृतज्ञता भाव जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस चेतन भोळे यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. किरण बिऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. रेखा वाणी, भानुदास सावदेकर, नीलिमा चोपडे, प्रज्ञा पाटील, धनंजय कासार, सतीश डोळसे, हरीश भोळे, ललित काळे, कांचन महाजन, वंदना महाजन ह्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करत मनोगते व्यक्त केली.
गिरीश वानखेडे, किरण सोनवणे, सुनिता कोल्हे, महेश नेहेते किरण भोळे, नरेंद्र सुलक्षणे, मनोहर बाविस्कर, भरत ढाके, रंजना पवार, विनोद धनगर, रूपाली चौधरी, कैलास चौधरी धनराज चौधरी,अर्चना,प्रिया मोरे, ललिता पवार, योगेश दुसाने यांनी मान्यवरांचे, शिक्षकांचे कृतज्ञतापूर्वक स्वागत सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन पाटील यांनी केले. मंगला नारखेडे, डी.जी. महाजन, यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केली.
















