जळगाव प्रतिनिधी । शहरातील मायदेवी नगर येथून एका घराबाहेरुन कार अज्ञान चोरट्यांनी लंबावल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.१०) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र हरी पाटील (रा.मायदेवीनगर) यांच्या मालकीची ही चारचाकी (एमएच १९ सीएफ २१०९) आहे. सोमवारी रात्री ९.३० वाजता पाटील यांनी चारचाकी लॉक करुन घराबाहेर उभी केली होती. मात्र, (दि.१०) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उठून बाहेर आले असताच त्यांनी लावलेल्या जागेवर कार दिसून आली नाही. यानंतर त्यांनी रामानंद पोलीस स्थानक गाठले आणि पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.