TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात आढळले 1 लाख 10 हजार जुन्या आजारांचे रुग्ण – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 477 कुटूंबांतील 34 लाख 81 हजार 169 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान संपूर्ण राज्यात 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जळगाव महापालिका क्षेत्रात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी तर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

READ ALSO

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 533 पथके, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 280 तर महापालिका क्षेत्रात 134 असे एकूण 2974 पथके जिल्हाभरात कार्यरत आहेत. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके जळगाव जिल्ह्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहेत. यात कुटूंबातील सदस्याचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणांची तपासणी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 6 लाख 53 हजार 673 कुटूंबांना भेट दिली असून या कुटूंबातील 27 लाख 7 हजार 311 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 78 हजार 210 जुन्या विकारांचे, सारीचे 555 तर सर्दी, खोकला, ताप (ILI)चे 6 हजार 332 रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून 9 हजार 339 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी 887 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यातील अठरा नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 68 हजार 888 कुटूंबातील 4 लाख 68 हजार 36 नागरीकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 20 हजार 529 जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 683 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले यापैकी 339 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

त्याचप्रमाणे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 89 हजार 916 कुटूंबातील 3 लाख 5 हजार 822 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 780 जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सारीचे 18, सर्दी, खोकला, तापाचे 179 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 166 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तर 86 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आले ८ लाख ११ हजार कोरोना लसीचे डोस

July 6, 2021

महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना ; ४७ एजन्सीज बडतर्फ

June 17, 2022

अकरावीतील आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

December 30, 2020

चाळीसगाव : पुरातन सीतान्हाणी पानपोई वास्तूची साफसफाई !

November 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group