रावेर (प्रतिनिधी) वडगाव शिवारातील सुकी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना मंडळाधिकारी रवी वानखेडे यांनी दोन ट्रॅक्टर पकडले. त्यांनी आपल्या पथकास सूचना देऊन दोन ट्रॅक्टर जप्त केले. यामध्ये समाधान गोविंदा पाटील यांचे एम.एच. १९ ए.एन. ५०८५ क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि विलास धनराज तायडे यांचे विनाक्रमांक ट्रॅक्टर समाविष्ट आहेत. दोन्ही ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून, त्यांना दंड ठरवण्यात आला आहे.
तालुक्यातील वडगाव शिवारातील सुकी नदीपात्रातून अवैध रित्या वाळू वाहतूक करताना मंडळाधिकारी रवी वानखेडे यांना आढळून आले. त्यांनी लागलीच आपल्या पथकाला सूचना देत बोलावून घेतले आणि दोघेही ट्रॅक्टर पकडण्यात आले त्यात समाधान गोविंदा पाटील ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १९ ए. एन. ५०८५, तसेच विलास धनराज तायडे यांचे (विनाक्रमाक नसलेलं ट्रॅक्टर ) अशी दोन ट्रॅक्टर पकडण्यात आली. दोघेही ट्रॅक्टर यांना रावेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेले असून त्यांना दंड ठरवण्यात आला आहे. तालुक्यातील वडगाव शिवारातील सुकी नदीपात्रातून अवैध रित्या वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे काही दिवसापूर्वी तहसील कार्यालयात आ. अमोल जावळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तहसीलदार बी.ए. कापसे यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
या पथकाने केली कारवाई
मंडळ अधिकारी, अनंत खवले, यासीन तडवी रवि वानखेडे, प्रवीण वानखेडे, प्रवीण नेहते, मंडळ अधिकारी, रवि शिगणे, रशीद तडवी, सुधीर खरात, अभिजीत डांगे भाग्यश्री बर्वे, दिपाली बुंदेले, ग्राम महसुल अधिकारी, विकास माळी, महेंद्र चौधरी, गणेश चौधरी, सिद्धांत लोखंडे, तुषार चौधरी महसूल सेवक, शिपाई सुनिल सोनार यांनी संयुक्त रित्या कारवाई केली.