फैजपूर (प्रतिनिधी) अयोध्या येथे निर्माण होत असलेले श्रीराम मंदिर तसेच देशातील मठ, मंदिरांची सुरक्षा, हिंदू संस्कृतीवर होत असलेलं आक्रमण, आणि देशाच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय संत समितीची महत्त्वाची बैठक दंदरोआ धाम (डॉ.हनुमान) ग्वालियर, मध्यप्रदेश येथे पार पडली.
या बैठकीला संत समिती निर्देशक महामंडलेश्वर स्वामी धर्मदेवजी महाराज हरियाणा, महामंत्री श्री. जितेंद्रानंदजी महाराज, राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, महामंडलेश्वर श्री. रामदासजी महाराज ग्वालियर, महामंडलेश्वर राधे राधे बाबा इंदौर, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज फैजपूर, महंत अरुणदासजी महाराज हरिद्वार यांच्यासह देशभरातील संत महंत उपस्थित होते. आपल्या खान्देशचे मानबिंदू फैजपूर येथील संतपंथ मंदिर संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व खंडोबा महाराज देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर १००८ पुरुषोत्तमदासजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी हिंदू धर्म व संस्कृती रक्षा याविषयी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले.