अहमदनगर (वृत्तसंस्था) द्राक्ष घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानकाला धडक दिली. ही घटना बुधवारी रात्री पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे घडली. यामध्ये एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातून द्राक्ष घेऊन टेम्पो (एम एच १५ डीके ६३८९) नाशिककडे निघाला होता. पारनेर तालुक्यातून जात असताना कान्हूरपठार गावात टेम्पोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानकात घुसला. तेथे काही लोक उभे होते, तर रस्त्यावर अन्य वाहने उभी होती. टेम्पोची धडक बसल्याने राहुल शिवराम पवार (वय १७ वडगाव दर्या) हा युवक जागीच ठार झाला. याशिवाय अतुल शिवराम घुले (वय ५० रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर), सतीश शिंदे (वय १४) गणेश आबा रोकडे (वय २० रा. वडगाव सावताळ), प्रकाश राजु पवार (वय ३८ रा. वासुंदे, ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी टेम्पो चालक अतुल प्रजापती याला अटक केली.
द्राक्ष घेऊन जाणारा हा टेम्पो वेगाने जात असताना ब्रेक फेल झाले. त्यानंतर घटनास्थळी पारनेरचे पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप आपले सहकारी अधिकारी विजयकुमार बोत्रे, बालाजी पद्मने यांच्यासह दाखल झाले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.