अमळनेर प्रतिनिधी । शहरात भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम माजी आ. स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे, याअंतर्गत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण होऊन रक्तदान शिबिरास देखील अनेकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे
सदर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश तर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील असलेले, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह आयोजित केला असून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपर्यंत सेवा सप्ताह होणार असल्याने त्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, गरीब रुग्णांना फळ वाटप, स्वच्छता अभियान या सारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात अमळनेर येथे वृक्षारोपण कार्यक्रम गलवाडे रोड श्रद्धा नगर, पैलाड भवानी मंदिर परिसर, शिरूड नाका आदी ठिकाणी घेण्यात आला. तसेच रक्तदानचा कार्यक्रम भाजप व युवा मोर्चाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस असल्याने युवकांनी मोठा प्रतिसाद शिबिरास देऊन रक्तदान केले. यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, मार्केट सभापती प्रफुल्ल पवार, माजी जि प सदस्य अॅड. व्हि आर पाटील, माजी सभापती श्याम अहिरे, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, बबलू राजपूत, राहुल पाटील, कु.उ.बा.संचालक पराग पाटील, शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन, राहुल पाटील, महेश पाटील, श्रीनिवास मोरे, माजी शहराध्यक्ष शितल देशमुख, शत्रूघन पाटील, महेंद्र बोरसे, महेश पाटील, स्नेहा एकतारे, दीपक पाटील, देवा लांडगे, जुलाल पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत, योगीराज चव्हाण, पंकज भोई, सागर मोरे, सोनु पाटील, घनश्याम पाटील, कमलाकर पाटील, रावसाहेब पाटील, कल्पेश पाटील, राहुल चौधरी, समाधान पाटील, निनाद जोशी, अनिस खाटीक, रवि ठाकूर, निखिल पाटील, भूषण पाटील, कुंदन पाटील, राहुल कंजर उपस्थित होते.
राज्यभर संघटन ही सेवा उपक्रम
कोरोना महासाथीचा मुकाबला करताना ‘संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार खालील कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. सेवा सप्ताह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांचा वाढिदवस (दि.१७ सप्टेंबर) रोजी साजरा झाला आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवाकार्य करून पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना करतात. यावर्षी पंतप्रधानांचा सत्तरावा जन्मदिवस होता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार २४ सप्टेंबर ते २०२० सप्टेंबरपर्यंत ‘सेवा सप्ताह’ असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.