धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बीएसएनएल ऑफिस जवळ राहणाऱ्या एका तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात रुपेश सुधाकर चौधरी (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत चौधरी यांनी म्हटले आहे की, राकेश दगडू पाटील याने मोबाईलवर फोन करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच ३ मे रोजी १० वाजेच्या सुमारास राकेश त्याचा भाऊ हितेश आणि ब्रम्हा असे तिघं जण घराजवळ आलेत. यावेळी तिन्ही संशयित आरोपींनी रुपेशला धक्का-बुक्की करुन चापटा बुक्क्यानी मारहाण करीत होते.
यावेळी रुपेशचे मित्र अनिकेत, निलेश, आकाश, राहुल असे सदरचे भांडण सोडवा सोडव करीत असतांनाच राकेश पाटील याने हा मला जास्त मातला आहे, असे बोलून त्याने हातातील लोखंडी सळई रुपेशच्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली,असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात राकेश दगडु पाटील, हितेष दगडु पाटील (दोन्ही रा. हेगडेवार नगर) आणि ब्रम्हा कैलास धनगर (रा.धनगर गल्ली) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत.