बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगणा शिवारात सर्पमित्रांनी एका अजगरला पकडून नुकतेच जंगलात सोडले आहे.
तालुक्यातील हिंगणा शिवारात मुक्ताईनगर रस्त्यावरील विजय आनफाट यांच्या शेतात २९ रोजी अजगर प्रजातीचा सर्प आढळला. त्यांनी लागलीच सर्पमित्र वैभव बच्छाव, कडू बावस्कर, सागर मोरे यांच्यासोबत संपर्क केला. त्यानंतर सर्पमित्र परिसरात आले व त्यांनी आठ फुट लांबीचा बिनविषारी अजगर पकडत आमदगाव येथील वन विभागाचे कर्मचारी डिगंबर पाटिल यांना देण्यात आला. त्यांनी तो अजगर माळेगाव महाकाली जंगलात सोडला.
सर्पमित्र वैभव बच्छाव , कडू बावस्कर , सागर मोरे नांदगाव प्रतिभानगर येथील सर्पमित्रांनी या अगोदर देखील अनेक सर्पांना जिवदान दिलेले आहे. यापुर्वी , घोणस , मन्यार असे इतर सर्प पकडले असून अजगर पहिल्यांदाच आढळल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. यातील सर्पमित्र वैभव बच्छाव यांच्या कार्याची दखल घेऊन हिंगोलीमध्ये ‘द रिअल हिरो 2022’ पुरस्कार देत त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, तालुक्यात सर्प आढळल्यास कडु बावस्कर (8888633775) , वैभव बच्छाव (9923248296) , सागर मोरे (9960535435) यांच्यासोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.