जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामानंदनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी चोरी करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केला आहे. इस्तीयाक अली राजीक अली (वय १९ रा. तांबापुरा, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शहरातील होणा-या घरफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रामानंदच्या हद्दीत झालेली घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार इस्तीयाक अली राजीक अली (रा. तांबापुरा जळगाव) याने त्याचे साथीदारासह केली आहे. याबाबत रामानंदनगर पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ३२९ / २०२२ भा.द.वि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूद्ध दाखल होता. या घरफोडीत घराच्या गोडावूनचे कडी-कोंडा तोडून सोन्याचे चांदीचे वापरते दागिणे, लॅपटॉप, मोबाईलची चोरी झाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना माहिती मिळाल्यानंतर पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील प्रीतम पाटील, अविनाश देवरे अशांचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना केले. या पथकाने तांबापुरा भागात जावुन शोध घेता माहीती मिळाली की, इस्तीयाक हा शामा फायर चौक तांबापुरा येथे उभा असल्याचे कळाले. सदर पथकाने सापळा इस्तीयाकला ताब्यात घेत घरफोडीच्या गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारासह केला असल्याचे कबुल केले.