जळगाव (प्रतिनिधी) फुकटात बियर न दिल्यामुळे बियरबारवर दगडफेक करीत गल्ल्यात ठेवलेली साडेचार ते पाच लाखांची रोकड जबरीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपा शेजारील मार्केटमध्ये घडली. तसेच याठिकाणी असलेल्या ग्राहकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी करीत चोरटे पसार झाले.
शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यासमोरील बियरबारवर गोळीबार झाल्याची घटना ताजीच असतांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपा शेजारील कॉम्पलेक्स मध्ये राजू केटवाणी यांच्या मालकीचे एन. एन. वाईन शॉप-बियरबार आहे. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन ते तीन इसम त्याठिकाणी आले. त्यांनी बारमधील मॅनेजरला पाच बियर फुकटात मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर नकार देण्यास दिल्याने त्या टवाळखोरांनी त्याठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच ते टवाळखोर बारमध्ये शिरले. त्याठिकाणी बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले.
दारुच्या शेत तरर्र दोघा गुंडानी एका माजी सैनीकाच्या डोक्यात बियर बॉटल फाडून त्याला गंभीर जखमी केले. तसेच बारमधील गल्ल्यातून सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड त्यांनी जबरीने हिसकावून ते टवाळखोर तेथून
दुचाकीने पसार झाले. पोलिसांनी विनापरवानगी डीव्हीआर केला जप्त घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बारमधील द सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ह निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलिसांना हॉटेल इन मालकाला विचारण्यापुर्वीच बारमधील सीसीटीव्ही उ कॅमेऱ्यांचा डीव्हीआर ताब्यात घेतला.
बारमध्ये दिवसभर जमा झालेली रोकड दुसऱ्या दिवशी बँकेत भरली जाते. मात्र दि. १२ रोजी पासून बँकेला सुट्टी असल्याने सुमारे चार दिवसांपासूनची रोकड गल्ल्यात ठेवलेली होती. हल्लेखोरांनी ती रोकड घेवून पोबारा केला. या घटनेमुळ परिसरात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टवाळखोरांनी बारमध्ये शिरुन दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच बारमधील टेबल खुर्चाची तोडफोड करीत नुकसान केले. दगडफेकीमुळे विक्रीसाठी ठेवलेल्या मद्यांच्या बाटल्या फुटून नुकसान झाले आहे.