TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांचे कनेक्शनचे अर्ज झटपट निकाली काढण्याचा आदेश दिल्यानंतर कंपनीच्या संपूर्ण यंत्रणेने युद्ध पातळीवर काम करून अवघ्या दहा दिवसात एक लाख चार हजार घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन देण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.

मा. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दि. २० जून रोजी राज्यभरातील मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत वीज कनेक्शनसाठी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. त्यावेळी १,१७,५२२ घरगुती वीज ग्राहकांचे जोडण्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे आढळले. मा. लोकेश चंद्र यांनी या प्रलंबित अर्जांच्या संख्येची गंभीर दखल घेतली व हे अर्ज झटपट निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणची यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली व केवळ दहा दिवसात १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आली.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २० जून रोजी प्रलंबित १,१७,५२२ घरगुती कनेक्शन अर्जांपैकी ८३,८३० घरगुती ग्राहकांना म्हणजेच ७१ टक्के ग्राहकांना दहा दिवसात नवीन वीज कनेक्शन देण्यात आली. या खेरीज राज्यात २० जूननंतर नव्या घरगुती वीज कनेक्शनसाठी ५९,९१८ अर्ज आले व त्यापैकी २०,५६१ ग्राहकांनाही दहा दिवसात कनेक्शन देण्यात आली. अशा रितीने एकूण १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन दहा दिवसात देण्यात आली.

मा. अध्यक्षांनी ग्राहकाभिमूख सेवेवर भर दिला आहे. नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज प्रलंबित राहता कामा नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार महावितरणने प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासोबत नवीन आलेल्या अर्जानुसार लवकरात लवकर कनेक्शन देण्यावर भर दिला आहे. दि. २० जून रोजी प्रलंबित असलेल्या अर्जांपैकी उरलेले अर्जही तातडीने निकाली काढण्यात येतील, असे मा. ताकसांडे म्हणाले.

घरगुती ग्राहकांचे नव्या वीज कनेक्शनसाठीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यामध्ये कल्याण झोनने आघाडी घेतली असून या झोनमध्ये १३,३११ नवी कनेक्शन देण्यात आली. त्या खालोखाल पुणे झोनमध्ये १२,२९६ नवीन कनेक्शन देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर कनेक्शन दिलेल्या ८९१५ अर्जांसह बारामती झोन आहे. मा. अध्यक्षांच्या सूचनेनुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी व्यापक काम सुरू केले आहे. यासाठी कंपनीच्या मुख्यालयात स्वतंत्रपणे देखरेख ठेवण्यात येत आहे व स्वतः अध्यक्ष कामाच्या प्रगतीचा वैयक्तिक आढावा घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत ; शरद पवारांनी बंडखोरांना खडसावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता : लॉकडाऊनमुळे शाळकरी मुली गर्भवती राहण्याचं वाढलं प्रमाण !

January 14, 2022

बोदवड येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या छायाचित्रास चपला मारून निषेध !

May 30, 2023

माणुसकीचे अनोखे दर्शन : मुस्लीम तरुणांकडून कोरोना मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार

March 17, 2021

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते २० लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप !

October 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group