जळगाव (प्रतिनिधी) नशिराबादच्या आठवडे बाजारात एक महिला बाजार करत असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची मंजी मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी, दुपारी ४ वाजेपासून ५.१५ वाजेपर्यंत नशिराबाद गावातील आठवडे बाजारात सौ. माधुरी प्रकाश वाणी (वय ६३) या बाजार करत असताना त्यांच्या गळ्यातील ७५,००० रुपये किमतीची सोन्याची मंजी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेवेळी त्यांना आपल्या गळ्यातील किमतीची वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आले आणि थोड्या वेळाने चोरीचे प्रकरण समजले. माधुरी वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, एसी मनोरे हे करीत आहेत.