पिंप्री खु., ता. धरणगाव (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध डॉक्टर राजेश केशरलाल पांडे यांच्या कन्या कुमारी रिषीता हिने जेईई मेन्समध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु. येथील सुप्रसिद्ध डॉ. राजेश केशरलाल पांडे यांची कन्या कुमारी रिषीता हिने जेईई मेन्स मध्ये 99.55% गुण प्राप्त केले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरातून तसेच सिकवाल ब्राह्मण समाजातर्फे अभिनंदनच्या वर्षाव होत आहे.