पाचोरा (प्रतिनिधी) ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती थांबवण्यासाठी पाचोरा काँग्रेस विभागीय कार्यालयात धडकली.
पाचोरा, भडगाव, पारोळा शहर व तालुक्यातील विज वितरण कंपनीने ऐन दिवाळीत थकीत बिल वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून यात अनेकांचे विज खंडीत करीत आहेत. अशातच शेतकरी वैतागले आहेत. घरगुती कनेक्शन कट झाल्याने दिवाळी अंधारात जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठीच पाचोरा काँग्रेसने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांची भेट घेऊन कॉंग्रेस पदाधिकारी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा, महिला तालुका अध्यक्ष अॅड. मनिषा पवार, जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, आरोग्य सेवा सेल जिल्हा सचिव डॉ. अनिरुद्ध साळवे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, समाधान ढाकरे, यश साळुंखे, रवी पाथरवट आदींनी कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी निवेदन देण्यात आले.
कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी कॉंग्रेस पदाधिकारी यांना आश्वासित केले की कोणत्याही शेतकर्यांचे, पाणी पुरवठा योजना, स्ट्रिट लाईट यांचे कनेक्शन कट होणार नाही तर घरगुती आणि व्यापारींचे थकीत बिले परीस्थिती नुसार येत्या दोन दिवसांत वसुली करु तर दिवाळीचे तिन दिवस मानवता दृष्टिने कोणाचेही कनेक्शन कट होणार नाही, असे सांगितले. कॉंग्रेसचे निवेदन तात्काळ वरीष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचेही शेवटी चव्हाण यांनी स्पष्ट केले.