जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आशादीप वसतीगृह प्रकरणामुळे जिल्ह्याचे राज्यात जळगाव जिल्ह्यातील बदनामी होत आहे. प्रकरणाची सत्यता तपासणी करूनच भाजपाने हा विषय विधीमंडळात मांडायला हवा होता. भाजपाने राजकारण केले असून याबाबत महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहात झालेला प्रकार आज राज्यात सर्वत्र गाजत आहे. यात जळगाव शहराची मोठी बदनामी होत आहे. भाजपाने याप्रकरणाची सत्यता व तपासणी करूनच विधीमंडळात हा विषय मांडायला हवा होता. अशादिप वसतीगृहा प्रकरणी अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा हा व्हिडीओ विश्वासहर्ता न तपासता सकल चौकशी होईपर्यंत भाजप विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत अत्यंत घाईघाईत संयम न बाळगता मुंगटीवार फडणवीस यांनी जी विधाने केली. त्यामुळे जळगाव शहराची बदनामी होत आहे. त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कुठलीही, अशी कोणतीही व्हिडीओ क्लिप नसतांना बेजबाबदार विधानाचा महाआघाडीच्या सरिता माळी-कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी निषेध केला आहे.