अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्याशाळा व पिबीए इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड-१९ तपासणी करण्यात आली असून महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शेलकर यांच्या सहकार्याने रोटरी हॉल येथे पार पडली.
या शिबिरात १३० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड-१९ “आरटी-पीसीआर” टेस्ट तपासणी शिबिरात करण्यात आली.यावेळी द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे, उपमुख्याध्यापक डी.एच. ठाकूर,पर्यवेक्षिका कल्पना गरुड,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शेलकर, राहुल महाजन, मनोज निकुंभ, प्रसाद क्षीरसागर आदी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.