मुंबई (वृत्तसंस्था) सर्वांत सुरक्षित आणि अधिक लाभ देणारा पर्याय म्हणून भारतीय पोस्ट खात्याकडून चालवल्या जाणाऱ्या सरकारी अल्पबचत योजनांना (Post Office Saving Schemes) मोठी पसंती दिली जाते. पोस्ट ऑफिसमधील एका योजनेत पैसे गुंतवल्यास वयाच्या पाचव्या वर्षी तुम्ही तुमच्या अपत्याला लखपती बनवू शकता. ही योजना आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्तीं ठेव योजना (Recurring Deposit Scheme).
पोस्ट ऑफिसमधील अल्पवयीन मुलांसाठी योजना
पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेमध्ये तुम्ही अल्पवयीन मुलांचे कायदेशीर पालक बनून आरडी सुरू करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक पाच वर्षांत परिपक्व (मॅच्युअर) होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या नावाने या योजनेत मासिक २००० रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास वयाच्या पाचव्या वर्षी लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमा होईल.
पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर किती व्याज मिळते?
जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर दर महिन्याला आरडीमध्ये २ हजार रुपये जमा कराल, तर पाच वर्षांत ही रक्कम एक लाख ४० हजार रुपये होईल. पोस्ट ऑफिसकडून सध्या ५.८ टक्के व्याज दिले जात आहे. चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. अशा प्रकारे, ५ वर्षांमध्ये तुमच्या मुलांच्या नावावर मोठी रक्कम जोडली जाईल.
वेळेपूर्वीही काढता येतात पैसे
तुम्ही मुलांच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडले आहे, पण जर तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वी पैशांची गरज असेल, तर तुम्ही ते बंद करू शकता, जर आरडी खात्यात ३ वर्षांसाठी पैसे जमा केले असतील, तरच तुम्ही हे करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे, मुदतपूर्तीपूर्वी आरडी खात्यातून पैसे काढल्यावर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकेच व्याज मिळेल. आरडी खाते देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते.