नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशात २९ हजार ६८९ कोरोना रुग्ण आढळले. तर ४१५ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३ लाख ९८ हजार १०० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ०६ लाख २१ हजार ४६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
काल दिवसभरात ५७ लाख लसीचे डोस देण्यात आले
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना लसीकरणाचा आकडा ४४ कोटींच्या पार पोहोचला आहे. काल दिवसभरात ५७ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर देशात आतापर्यंत ४४ कोटी १० लाख ५७ हजार १०३ डोस देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात दुपटीहून अधिक रूग्ण कोरोनातून बरे झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या ही दुपटीहून अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. राज्यात ११ हजार ७७ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ४ हजार ८७७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज ५३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.