नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ४ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २१९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४८ रुग्ण आढळले असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ हजार ९०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारच्या तुलनेत आज सापडलेली रुग्णसंख्या ८.९ टक्क्यांनी कमी आहे. रविवारी देशात ४२ हजार ७६६ कोरोनाबाधित आढळले होते. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.४४ टक्क्यांवर आहे. देशात सध्या ४ लाख ४ हजार ८७४ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. नव्या बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख २७ हजार ६२१ वर पोहोचले आहेत. त्यापैकी ३ कोटी २१ लाख ८१ हजार ९९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत ४ लाख ४० हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सध्या देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.५८ टक्क्यांवर असून हा दर सलग ७३व्या दिवशी ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट २.७६ टक्के आहे. तसेच देशात गेल्या २४ तासांत २५ लाख २३ हजार ८९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६८.७५ कोटी लोकांचं लसीकरण झालंय.
राज्यात काल ४,०५७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९४ हजार ७६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. राज्यात काल ६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५० हजार ०९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १२,३२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.