चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलाखेड येथे आठ दिवसांपूर्वीच मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या शाखेला आठ दिवसात बंद करण्याची नामुष्की उबाठा सेनेवर आली आहे. सदर शाखेत सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने बिलाखेड गावात उबाठा सेनेना जबर धक्का बसला आहे.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले पदाधिकारी खालीलप्रमाणे
1) गणेश राजाराम जगताप – जेष्ठ नेते 2) अमोल बापूराव निकुंभ – जेष्ठ मार्गदर्शक 3) शेषराव सुभाष निकुंभ – जेष्ठ मार्गदर्शक 4) संजय हिरामण पाटील – जेष्ठ मार्गदर्शक 5) वाल्मिक पंढरीनाथ निकुंभ – मार्गदर्शक 6) कारभारी ज्ञानदेव सूर्यवंशी – मार्गदर्शक 7) अनिल देवराम सूर्यवंशी – जेष्ठ मार्गदर्शक 8) एकनाथ नामदेव पाटील – जेष्ठ मार्गदर्शक 9) अजय जनार्दन पाटील – ग्रा. पं. सदस्य 10) विशाल राजेंद्र तोंडे – ग्रा. पं. सदस्य 11) संदीप भिमराव मोरे – ग्रा. पं. सदस्य 12) सागर विठ्ठल मुलमुले 13) विनोद दयाराम पाटील 14) हेमराज मुकुंद पाटील 15) पंकज शिवराम पाटील 16) मनोज भगवान पाटील 17) किरण पंढरीनाथ पाटील 18) हर्षल काळे 19) अविनाश सोनवणे 20) अविनाश घोलप 21) पवन निकुंभ 22) हर्षल युवराज पाटील 23) समाधान भाऊसाहेब रावते 24) अतुल रावते 25) राहुल भिल्ल 26) किशोर गायकवाड 27) दिपक गायकवाड 28) रमेश गायकवाड 29) गंगाराम कोळी 30) तुळशीराम कोळी 31) छोटू पाटील 32) शांताराम गायकवाड 33) विकास पाटील 34) आकाश पाटील 35) समाधान रावते 36) गणेश रावते 37) शुभम रावते 38) जनार्दन मोरे 39) रोहित डोखे 40) रवींद्र नाईक यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, पंढरपूर वारी असेल रायगड वारी तसेच तालुक्यातील कोट्यवधीची विकास कामे करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. बेलगंगा, गिरणा माय च्या नावाने मागील लोकप्रतिनिधी यांनी फसवले मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आमच्या बिलाखेड गावाला थेट गिरणा धरणावरून पाणी आणून गावाची तहान भागवली आहे. जनतेत राहून सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारे आमदार मंगेश जे बोलतात ते करतात म्हणून चाळीसगाव तालुक्याचे आमदार शोभतात, असे सांगत उबाठा गटातील सर्व पदाधिकारी यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष नितीनदादा पाटील, वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉक्टर प्रशांत एरंडे, प्रशांत नाना देशमुख, धनंजय मराठे, तांबोळे सरपंच निलेश जाधव, संदीप गवळी, योगेश गव्हाणे, दिनेश चौधरी, अक्की राजपूत आदी उपस्थित होते.