जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असते. तळपत्या उन्हात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर्सला इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मोठी छत्री देत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
जळगाव शहरात हजारो हॉकर्स आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी रस्त्यावर दुकान थाटतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हॉकर्सला देखील उन्हाचा फटका बसतो. जळगाव शहरातील काही हॉकर्सला इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मोठी छत्री भेट देण्यात आली. प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोशी, ट्रेझरर नेहा नैनानी आदी उपस्थित होते. उन्हाळ्यात छत्रीमुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याने हॉकर्सने इनरव्हील क्लबचे आभार मानले.