जळगाव (प्रतिनिधी) डॉ. सुनिल गाजरे यांच्या रुग्णालयांत सुनिल बडगुजर उपचारासाठी गेले होते. मात्र अवघ्या ३-४ तासातच त्यांची प्रकृती खालावली. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यावर सुद्धा कल्पना दिली नाही, ही बाब अत्यंत अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे याप्रकरणात डॉ. सुनिल गाजरे यांचा अत्यंत निष्काळजीपणा दिसून येत असून याप्रकरणाची वैद्यकिय तज्ञांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राहुल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रुग्णाच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी राहुल राजेंद्र पवार (वय ३० रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, माझे मेहणे सुनिल बाबुराव बडगुजर (वय- ३९), रा. सावदे, रिंगणगाव, ता. एरंडोल, जि जळगाव हे कोविड पॉझिटिव्ह असल्याचे रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या चाचणीतुन निष्पन्न झाले होते. ही चाचणी दि. १५ मार्च २०२१ रोजी करण्यात आली होती. प्राथमिक तपासणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले होते. या दरम्यान, स्थानिक डॉ. राहुल बनसोडे यांनी दि. १६ मार्च रोजी उपचार सुरु केले. मात्र प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. म्हणून डॉ. बनसोडे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जळगाव बसस्टँड जवळील न्युरोलॉजी डॉ. सुनिल गाजरे यांचे गाजरे हॉस्पिटल येथे अॅडमिट केले. दुपारी २ वा. उपचार सुरू केले. त्यानंतर दु. ३ वा. गाजरे हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार की आमचे व्हेंटीलेटर केव्हाही बंद पडू शकते. त्यामुळे वेगळी व्यवस्था करावी लागेल. तुर्त उपचार सुरू आहे. यादरम्यान त्यांनी ४० हजार रुपये किंमतीचे इंजेक्शन पेशंटला दिले. रुग्णाच्या तब्बेतीची विचारणा केली असता. डॉ. गाजरेंनी सांगीतले की, उपचार सुरू आहे. घाबरण्या सारखे काही नाही. आम्हाला त्यांच्या बोलण्यातुन शंका आली म्हणून आम्ही आमचे परिचीत डॉक्टर यांना हॉस्पिटलमध्ये घेवून आलो. त्यांनी रूग्ण तपासणी केली असता. रूग्ण मृतअवस्थेत असल्याचे त्यांनी सांगीतले. ही घटना सायं. ६ वाजून ४४ मिनिटांनी घडली.
माझे मेहूणे डॉ. सुनिल गाजरे यांच्या रुग्णालयांत जेव्हा उपचारासाठी आले होते. तेव्हा चालत आले होते व फार गंभीर अवस्थेत नव्हते. असे असतांना अवध्या ३-४ तासातच त्यांची प्रकृती एवढी खालावली कशी? यात डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला. व रूग्णाचा मृत्यू झाल्यावर सुद्धा कल्पना दिली नाही हि बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे याप्रकणात आम्हाला डॉ. सुनिल गाजरे यांचा अत्यंत निष्काळजीपणा दिसून येत आहे. कृपया याप्रकरणाची वैद्यकिय तज्ञांकडून चौकशी व्हावी.
















