जळगाव – येथील जोशी कॉलनीत शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जोशी कॉलनी येथील गुरू गोरक्षनाथ मंदिर येथे भागवत कथा सुरू आहे. शनिवारी कथेचा तिसरा दिवस होता. कथा दरम्यान शिवपार्वती विवाह सोहळ्याच्या प्रसंगात झाकी सादर करण्यात आली. यावेळी ब्रह्मा, विष्णू, महर्षी नारद,यासह महादेवाचे भुतगण अशी सजीव आरास सादर झाली. यावेळी लग्न सोहळ्याने कथेत चैतन्य निर्माण झाले. लग्न लागल्यानंतर भुतगणासह उपस्थित श्रोत्यानिही ठेका धरला. यावेळी कथेने उचांक गाठला. दरम्यान रात्री ८ वा. ह.भ.प. मालतीताई टीटगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.