अमेरिका (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या उदयोजकाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे.
ठाणेदार म्हणाले की, मी कोविड येण्याआधी प्रचाराला सुरुवात केली आहे. दोन वर्षापूर्वी मिशीगन गव्हर्नरसाठी उभा होतो. आता मी आमदार म्हणून मी निवडून आलो आहे. राजकारणात प्रत्यक्ष उतरणं आवश्यक आहे. बाहेर बसून नावं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्यक्ष तिथं जाऊन प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मला या देशानं खूप काही दिलंय, त्यामुळं मी त्यांचं देणं लागतो, मला खूप काम करायचं आहे, असं ठाणेदार म्हणाले. त्यांनी सांगितलं की, मुख्य निवडणुकीचं तिकिट मिळवण्यासाठी आधी पक्षांतर्गत निवडणूक होते. त्यातून विजयी होणाऱ्याला तिकिट मिळतं. मला प्रायमरीमध्ये डेमोक्रेटिक पक्षानं निवडून दिलं. मला शिक्षण, रस्ते, उद्योगांवर काम करणार आहे. गरीबांसाठी काम करायचं आहे, असं ते म्हणाले. ट्रम्प यांच्या कोर्टात जाण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, निवडणुकीत जो बायडन आणि डेमोक्रेटिक पक्ष निवडून येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ट्रम्प यांना पराभव स्वीकारायचा नाहीय, त्यामुळं ते आता कोर्टात गेले आहेत. बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्रपती होतील, असं ठाणेदार म्हणाले. ट्रम्प यांना असं करण्याची सवय आहे. कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही, न्यायालयीन पद्धती चांगली आहे. काही दिवस फक्त आम्हाला यातून जावं लागणार आहे, असं ते म्हणाले.
श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक – ‘ही श्रीची इच्छा’ प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.२४ व्या वर्षी मी अमेरिकेत गेलेल्या ठाणेदार यांनी आपला झेंडा अमेरिकन राजकारणात रोवला आहे. त्यांनी 25 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 93 टक्के मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 6 टक्के मतं मिळाली. त्यांनी 2018 मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना दोन लाखांहून जास्त मतं मिळाली होती. आत्ताच्या निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.