नांदेड (प्रतिनिधी) येथे भरत सैंदाणे क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंग केली. मंत्री पाटील यांनी चौकार मारल्या नंतर प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. एरवी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील क्रिकेट मैदानात मध्ये देखील फटेकबाजी केली.यावेळी युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
नांदेड येथे भारत सैंदाणे यांनी आयोजित क्रिकेट क्लबतर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे. आज सकाळी नांदेड येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत पहिले बक्षीस भगवान महाजन यांच्याकडून रु. ५६५६, दुसरे बक्षीस कृणाल इंगळे यांच्याकडून रु. ३५३५ आणि अतुल पटेल यांच्याकडून तिसरे बक्षीस रु. २५२५ पारितोषिके जाहीर केले आहे. या स्पर्धेत सुमारे १२ संघ सहभागी झाले असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते येथील स्टार क्लब विरूध्द सन्नाटा क्रिकेट क्लब या संघातील सामन्याचा टॉस करण्यात आला. नंतर पालकमंत्र्यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले.
याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपल्या आयुष्यात क्रिकेटला खूप महत्वाचे स्थान असल्याचे नमूद करत क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा, आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला ……हे गीत म्हणून त्यांनी क्रिकेट व जीवनातील साम्य विशद केले. यावेळी येथील युवकांसाठी साहित्यासह व्यायामशाळा मंजूर करणारा असल्याचे सांगून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भगवान महाजन यांनी केले तर आभार भरत सैंदाणे यांनी मानले,
याप्रसंगी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, , उपतालुका प्रमुख मोतीलाल पाटील , धानोरे सरपंच भगवान महाजन, युवासेनेचे कृणाल इंगळे, प्रवीण पाटील, गबा भोई, चंदू बऱ्हाटे, ज्ञानेश्वर कोळी. ललित पाटील, भानुदास पाटील, , गोकुळ सैंदाणे, भावेश भोई, निलेश कोळी यांच्यासह परिसरातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.