धरणगाव (प्रतिनिधी) येथील बसस्थानकाजवळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक निधीतून संतशिरोमणी गुरू रविदास महाराज चौकाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा आज सायंकाळी होणार आहे. तसेच शहरातील पी. आर. विद्यालयात चर्मकार बांधवांच्या समाज मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे व माजी नगराध्यक्ष अंजलीताई विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माधव गायकवाड, तुकाराम गोतीसे, दिलीप कानडे, वसंत बाविस्कर धनराज अहिरे,अमळनेर मंगळ ग्रहाचे अध्यक्ष डिगंबर महाले, मुकुंद सपकाळे, मुकुंद नन्नवरे, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह राज्यातील आणि जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.