भुसावळ (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड संदिप पाटील यांचे सुचनेन आज रविवार रोजी सकाळी 11वाजता भुसावळ शहर काँग्रेस कमिटी तफै जैन मंदिर आठवडे बाजार येथे स्वाक्षरी मोहीमेच उद्घाटन करण्यात आले
हे उद्घाटन माजी आमदार निळकंठ फालक, शहर अध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुनव्वर खान यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकरी व कामगार, बेरोजगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, शैलेश अहिरे, महेंद्र महाले, सुकदेव सोनवणे जे.बी.कोटेचा तालुका सरचिटणीस राजेंद्र श्रीनाथ, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलीम गवळी मागासवर्गीय विभागाचे शहर अध्यक्ष सुनिल जवरे, महिला काँग्रेस अध्यक्ष रेखाताई सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हमिदा गवळी, जिल्हा सरचिटणीस राणी खरात, शहर उपाध्यक्ष यास्मीन बानो विनोद पवार, अजिंक्य जैन प्रदिप पाटील, सुरेश थेटे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.