जळगाव (प्रतिनिधी) अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रिक्षा युनियनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्बन सेलच्या जिल्हध्यक्षा डॉ. अश्विनी देशमुख, कार्याध्यक्ष मनोज वाणी समन्वयक मुविकोराज कोल्हे, यशवंत पाटील, राकेश पाटील, प्रवीण महाजन, जुबेर खाटीक, मिलिंद सोनवणे, पंकज वाघ उपस्थित होते.
महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेतून व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कणखर भूमिकेचा आदर्श घेऊन आम्ही राष्ट्रवादी रिक्षा युनियन स्थापन करण्यात आली. जळगाव शहरात सुमारे आठ ते दहा हजार रिक्षा असून सर्वच रिक्षाचालक-मालक हे सर्वसाधारण कुटुंबातील आहे. आज सद्यस्थितीत जळगाव शहरात राष्ट्रवादी रिक्षा युनियन व्यतिरिक्त कोणतीही अन्य रिक्षा युनियन सक्रिय कार्यरत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील रिक्षा चालक-मालक राष्ट्रवादी रिक्षा युनियनमध्ये सहभागी झाले आहेत आगामी काळात या कष्टकरी वर्गासाठी राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे त्यांना येणाऱ्या समस्या पोलिसांचा नाहक त्रास यानी बेजार झालेल्या रिक्षा चालक मालक यांच्या पाठीशी खंबीरपणे राष्ट्रवादी अर्बन सेल उभा राहणार आहे. या रिक्षा युनियनची दीपक पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.