पुणे (वृत्तसंस्था) पुण्याच्या शिरुर तालुक्यातील एका गावात जन्मदात्या नराधम बापाकडूनच आपल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरोधात बलात्कार (Sexual Assault) आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावात पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. पीडित अल्पवयीन मुलीचा नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला होता. त्यामुळे त्यानं पत्नीशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या नराधम बापानं दारूच्या नशेत घरात झोपलेल्या पोटच्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली. या घटनेनं बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. या नराधमाच्या कृत्यानंतर पीडित मुलीच्या आईनं परिसरात आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. त्यानंतर जमा झालेल्या लोकांनी नराधमावर तीव्र संताप केला. आता त्या नराधमावर स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.