मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यावरुन कंगनाविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉलिवुडमधील आगामी ‘थलाइवी’ हा चित्रपट मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असून, चित्रपटात कंगना जयललिताच्या भूमिकेत झळकणार आहे. लॉकडाऊननंतर तिने या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच सुरु केले होते . मात्र कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्वीटसाठी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले.
काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने ट्विट केले होते की,’कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला होता.’
अशातच कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्वीटसाठी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले आहे. दरम्यान, वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयां क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधा एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.