नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर शहराची लोकसंख्या आणि हद्द वाढली आहे. परंतु, त्या तुलनेत कचरा संकलनासाठी दिला जाणारा मोबदला पूर्वी जास्त होता. पण आता वर्तमानात नियुक्त कंपन्यांकडून कचरा संकलनाबाबत मनमानी केली जात आहे. नागपूर शहराची लोकसंख्या आणि सीमाक्षेत्र वाढले आहे. त्या तुलनेत शहरातील कचरा संकलन वाढत नसून उलट विस्मयकारी घट होताना दिसत आहे.
घरादरातून आणि बाजारातून होणारे कचरा संकलन दररोज साधारण २३० ते २५० टणानी घासरत आहे. गेल्या वर्षापर्यंत सरासरी दर महिन्यात ११५० ते १२०० मेट्रिक टन कचरा संकलन होत होता. नोव्हेंबर मध्ये मनपाने कचरा संकलन व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी झोन एक ते पाच पर्यंत ची जबाबदारी एनवायरोकडे सोपवली तर्झोन सहा ते दहा ची जबाबदारी बिविजी कंपनीला देण्यात आली. दोन्ही कंपन्यांच्या निवृत्तीनंतर येत असलेल्या आकडेवारीवरून कचरा संकलनात प्रचंड घसरण नोंदविली जात आहे. शहराच्या सीमावर्ती भागात कचरा संकलनासाठी गाड्या रोज येत नाहीत. एक दिवस आड येत असल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावर, मोकळ्या भूखंडावर वगैरे फेकताना दिसतात. विजयादशमी नंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरादारातील साफसफाईची प्रक्रिया गतिशील होत आहे. त्यामुळे, या काळात मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. गाडी येत नसल्याने कचरा रस्त्यावर दिसण्याची शक्यता आहे.
टाळेबंदी नंतर संकलनाची स्थिती १००० मॅट्रिकच्याही खाली आली होती. तसेच अल्ल प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही संकलनाची स्थिती ९३० ते ९३५ मेट्रिक टन च्या जवळपासच राहिली आहे. पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुतांश वस्त्यांमध्ये कचर्या गाड्यांच्या अनियमित तेच्या तक्रारी नागरिक नगरसेवकांकडे करत आहे. सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित होत असल्याने वजन कमी भरत असल्याचा अंदाज मनपाच्या घनकचरा विभागाचा आहे.















