जळगाव (प्रतिनिधी) : फोनवर बोलणे झाल्यानंतर जिन्यातून उतरत असतांना महिलेला डोळा मारुन अश्लिलल हातवारे करीत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. ही घटना दि. ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित विजय मुरलीधर सोनवणे (रा. नंदगाव, ता. जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात महिला वास्तव्यास असून दि. ४ जानेवारी रोजी ती महिला फोनवर बोलण्याकरीता घरातील जिन्याजवळ गेली होती. फोनवर
बोलणे झाल्यानंतर ती खाली उतरत असतांना त्यांच्या घरासमोर राहणारा संशयित विजय सोनवणे याने त्या महिलेला डोळा मारला. त्यानंतर अश्लिल हावभाव करीत तो त्या महिलेच्या घराजवळील जिन्याजवळ आला. त्याने महिलेचा हात पकडून तिच्यासोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. ही बाब महिलेने कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तात्काळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित विजय मुरलीधर सोनवणे (रा. नंदगाव, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दीपक चौधरी हे करीत आहे.
















