चोपडा (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिन निमित्ताने पंकज विद्यालयात पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सर्व शैक्षणिक विभागाचा संयुक्तिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी मे… मिल जावा’ गीताचे सामूहिक गायन केलं.
संकुलाच्या भव्य मैदानावर ध्वजारोहण संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे संचालक पंकज बोरोले, गोकुळ भोळे, हेमलता बोरोले, दिपाली बोरोले, मुख्याध्यापक एम व्ही पाटील, व्ही. आर पाटील, प्राचार्य केतन माळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यानी झेंडा गीत व पाचवी ते सातवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गिताचे गायन केले. भाग्येश वाघ व हिमाली पाटील यांनी प्रभावी भाषण करून सर्वाची मने जिंकली.
इंग्लिश मिडीयम स्कूल व माध्यमिक विद्यालय इयत्ता दहावी विद्यार्थिनी यांनी देशभक्ती समूह नृत्य सादर केले. विद्यालयात विद्यार्थी वाढदिवस निमित मान्यवरांनी विद्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा दिल्या. मैदानावरील विद्यार्थ्यानी तेरी मिट्टी ……. मे मिल जावासामूहिक गायन केले. यावेळी विविध जयघोषनेने सर्व परीसर दुमदुमला होता. सदरील समारंभासाठी बालसंस्कार केंद्र, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी, पालक बंधू भगिनीं,सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्याना राष्ट्राप्रती जोश व देशप्रेम निर्माण करणारे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.













