चेन्नई (वृत्तसंस्था) एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडपुढं चांगलीच आव्हानं उभी राहिली आहेत. ४८ ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची यशस्वी कामगिरी केली आहे. इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्यात यश आलं आहे. इंग्लंडने ८ विकेट्स देखील गमावले आहेत.
चेन्नईतील चेपॉक मैदानात दुसऱ्या सामन्य़ाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड असल्याचं आताच्या स्कोअरवरून तरी दिसून येत आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२९ धावा केल्या आणि त्यांचे सर्व गडी बाद झाले. ४८ ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची यशस्वी कामगिरी केली आहे. इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्यात यश आलं आहे. इंग्लंडने ४८ ओव्हरमध्ये आपला सातवा गडी गमावला. मोईन अली अवघ्या ६ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी सुरू आहे. भारतीय संघाची स्थिती सध्या बऱ्यापैकी मजबूत झाली आहे. इंग्लंड संघाच्या ८ विकेट पडल्या आहेत. सिराजने ओली पोपला २२ धावांवर तंबूत पाठवले. डॅन लॉरेन्स ५२ चेंडूंत ९ धावा काढून बाद झाला. तर रूट अवघ्या ६ धावांवर बाद झाल्यानं संघाचं मनोबल खचल्याची चर्चा आहे. अश्विनने डोम सिब्लीला १६ धावांवर तंबूत पाठवलं आहे. लॉरेन्स आऊट झाल्यानंतर जो रुट आणि बेन स्टोक्स या सर्वात अनुभवी जोडीवर इंग्लंडची भिस्त होती. स्टोकसं त्याच्या आक्रमक खेळाला मुरड घालत संयमी खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फार काळ यशस्वी झाला नाही. अश्विननं त्याला विराट कोहलीकडे कॅच देण्यास भाग पाडले. स्टोक्स फक्त ८ रन काढून आऊट झाला.
भारतानं शनिवारी आणि रविवारी दोन दिवस भारतानं चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक रहाणेनं उत्तम खेळी केली. रोहित शर्मानं १६१ धावांची मिळवून दिल्या तर रहाणेनं शतक पूर्ण केलं. सध्याच्या स्थितीला टीम इंडियाची स्थिती खूप मजबूत दिसत आहे. इंग्लंडचा ८वा खेळाडू देखील तंबूत परतला आहे. अश्विनने ऑली स्टोनला बाद करून चौथी विकेट आपल्या नावावर करून घेतली आहे.