टोकयो (वृत्तसंस्था) हंगेरी इथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने या स्पर्धेत ७५ किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.
प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
हरियाणाच्या क्रिडा मंत्र्याकडून अभिनंदन
प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलंय, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाची सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिंच अभिनंदन.”