TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुढील आर्थिक वर्षात डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता !

पालकमंत्र्यांच्या आग्रहास्तव 70 कोटींची वाढ ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले होते सादरीकरण

vijay waghmare by vijay waghmare
March 13, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) 2024-25 करीता शासनाने 607 कोटी नियतव्यय मंजूर केला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल अतिरिक्त 70 कोटी रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 677 कोटी कोटींच्या तरतुदीला मान्यता दिली आहे. यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, स्मशानभूमी व पोहोच रस्त्यांच्या कामासाठी म्हणजे जनसुविधेसाठी प्रथमच तब्बल 64 कोटीं निधीची तरतूद केली आहे. तर नागरी क्षेत्रासाठी 79.52 कोटी निधीस मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीणसह नागरी क्षेत्राला विकासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2025 – 26 च्या 10 फेब्रुवारीच्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला प्रारूप आराखड्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले होते.

जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन 2025-26 करिता शासनाने कमाल आर्थिक मर्यादा नियतव्यय रु. 574.59 कोटी एवढी निश्चित केलेली होती. मात्र, कार्यान्वयीन यंत्रणांनी रु.1402.20 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्यातील आमदारसह- लोकप्रतिनिधीनी जिल्ह्यातील विकास कामांची निकड लक्षात घेता जिल्ह्यातील लोकोपयोगी कामांसाठी वाढीव निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्याकडून करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर जिल्हा वार्षिक योजनेचा नियतव्यय अंतिम करताना यंत्रांची मागणी, लोकसंख्या ,जिल्ह्याचे वैशिष्ट्य अनुषंगिक बाबी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तसेच जिल्ह्याची कामांची निकड लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी अतिरिक्त 70 कोटी निधीची वाढ केली आहे.

READ ALSO

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

‘पालकमंत्री जनसुविधा विकास कार्यक्रम’ प्रभावी ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्ह्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. विशेषतः मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात 100% निधी खर्च होत असल्यामुळे शासनाच्या विश्वासात जळगाव जिल्ह्याने अग्रक्रम मिळवला आहे. विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा संपूर्ण राज्यात अग्रस्थानी असल्याने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्ह्यासाठी 70 कोटींचा अतिरिक्त वाढीव निधी मंजूर केला असून, हा निधी जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरणार आहे. या वाढीव निधीमुळे ‘पालकमंत्री जनसुविधा विकास कार्यक्रम’ प्रभावीपणे राबवला जाणार आहे. जिल्ह्यात 100% अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचा निर्धार असून ग्रामीण भागातील पशुसंवर्धन दवाखाने, शेतकऱ्यांसाठी नवीन एमएसईबी ट्रान्सफॉर्मर, जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यांसारखी महत्त्वाकांक्षी विकास कामे जलदगतीने पूर्ण करता येणार आहेत. आगामी काळातही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम राहणार आहे.
-पालकमंत्री गुलाबराव पाटील

79.52 कोटीं निधीतून नागरी क्षेत्रासाठी होणार फायदा
जिल्ह्यातील गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता जिल्ह्यांना नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियत्व उपलब्ध करून देण्याची आवश्यकता विचारात घेऊन सन 2025-26 साठी जळगाव जिल्ह्यासाठी एकूण निधीपैकी विशेष अतिरिक्त नियतव्यय 79.52 कोटींनी मंजूर केला आहे. या निधीतून महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा, नागरीक्षेत्र अग्निशमन गाड्या , शहरात भुसावळ प्रमाणे चौका – चौकात CCTVव अनुषंगिक बाबी प्राधान्याने कामे करण्यात येणार आहे.

जिल्हा विकास आराखड्यासाठी 169 कोटींची तरतूद
नियोजन विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नाविन्यपूर्ण योजना आणि मुल्यामापन व सनियंत्रण – 5%, महिला व बालकल्याण – 3%, गुह विभाग – 3%, शालेय शिक्षण विभाग सर्व सामावेषक योजना – 5%, गड, किल्ले व मंदिर व महत्वाची संरक्षित स्मारके इ. चे संवर्धन – 3%, गतिमान प्रशासनासाठी – 5 %, दिव्यांग व्यक्ती कल्याण व सक्षमीकरण – 1% तसेच महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 -28 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत उभारण्याचे महत्वकांक्षी लक्ष निश्चित करण्यात आल्यानुसार शासनाने दिलेल्या सूचनानुसार ‘जिल्हा विकास आराखडा’तयार करण्यासाठी 25 % निधी खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध विकासात्मक क्षेत्र / उपक्षेत्र या संदर्भात आखण्यात आलेल्या उपक्रम योजना /प्रकल्प यासाठी राज्य /केंद्र व जिल्हा वार्षिक योजनेद्वारे जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतिम मंजूर नियतव्यय या पैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यानुसार निश्चित केलेला असून त्यानुसार जिल्हा विकास आराखड्यासाठी 169 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGovernment approves provision of Rs 677 crore for DPDC General Scheme in next financial year!

Related Posts

गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशिभविष्य 14 मार्च 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात भाजपकडून ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शो !

June 5, 2023

सुवर्ण महोत्सवी योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

March 25, 2021

वीज बिलांवरुन महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणेंची टीका

November 19, 2020

हनी ट्रॅप प्रकरण : वाणी मोहरा तर देशमुख खरे सूत्रधार ; कल्पना पाटील यांचा आरोप (व्हिडीओ)

October 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group