पुणे (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात राज्य सरकार येत्या १ मे रोजी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले, “देशात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. इतके दिवस आपल्या राज्याची जी गरज होती, ती भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी दिली. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी दिली. भरलेले टँकर रेल्वे, बाय रोड सेवेने येतील.” “पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता डिस्चार्जची संख्या वाढत आहे. बरेच पेशंट रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेतोय. १८ ते ४४ वयामध्ये लसीसाठी केंद्र राज्यांवर जबाबदारी देत आहे. आम्ही ५ जणांची कमिटी बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “बल टेंडरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख असेल. इंजेक्शनचा तुटवडा आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तसं आहे.”“ऑक्सिजनबाबत जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते सुरु करत आहोत. काही वीजेअभावी बंद होते, काही फायनान्सिअली बंद होते. ते सुरु करत आहोत. पवारसाहेबांनी सूचना केली आहे, साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जामनगरचा जो कोटा आहे तो वाढवला नसला तरी कमी करु नका अशी केंद्राला विनंती केलीय,” असं अजित पवार यांनी सांगितलं.