धरणगाव (प्रतिनिधी) इन्स्टाग्रामवरून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार पाळधी येथे घडला. या प्रकरणी इन्स्टाग्राम युजरवरविरुद्ध धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या पूर्वी गौरव बळीराम लोहार (वय १९, रा. पाळधी) याने एका धर्माच्या भावना दुखावणारी क्लिप काढून ती इंस्टाग्राम स्टेटसवर ठेवली. या इंस्टाग्राम स्टेटसमुळे दोन धर्मात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण केली म्हणून गौरवविरुद्ध हाफिज दादामिया देशपांडे (वय ६५) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन अर्जुन महाजन हे करीत आहेत.