जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित विशेष दत्तकगृह/ शिशुगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड करुन अध्यक्ष, निवड समिती तथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेली होती. तसेच त्यातील मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ही शासनाच्या www.Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील दर्शनीय भागात देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे.
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवार २९ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहेत. मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र हे त्यांच्या अर्जात नमूद मेल आयडीवर पाठविण्यात आलेले आहे. व सदर मेल प्राप्त न झाल्यास संबधितांना या कार्यालयास संपर्क साधावा. सदर भरती प्रक्रिया ही प्राप्त गुणांकनाच्या आधारे व पारदर्शक पध्दतीने पार पडणार आहे. कुणीही कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, दूरध्वनी क्रमांक 0257 – 2228828 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.