नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या कोरोनाच्या संकटकाळात बचतीबरोबरच गुंतवणूक (investment) करणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुमचे उत्पन्न किती आहे, कशासाठी गुंतवणूक करत आहात, किती गुंतवणूक करायची आहे आणि कुठे या गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे. पोस्ट ऑफिसची (Post Office) एक योजना असाच एक पर्याय उपलब्ध करून देते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक (Investment)केल्यास तुमचा ३५ लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो.
पोस्ट ऑफिसकडून रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स योजना चालवल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून यात योजनांची आखणी केली जाते. रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स योजनांची सुरूवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. याअंतर्गत पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनादेखील चालवली जाते. या योजनेत छोट्या गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदार मोठी रक्कम मिळवू शकतात.
दर महिन्याला फक्त १,५०० रुपयांची गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या ज्या योजनेबद्दल आपण जाणून घेत आहोत ती आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना. ही एक प्रकारची विमा योजना आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला १,५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला ३५ लाख रुपये मिळतात. पोस्ट ऑफिसच्या या दमदार योजनेबद्दल जाणून घेऊया. या योजनेत किमान सम अश्युअर्ड १०,००० रुपये असून गुंतवणुकदार १० लाख रुपयांपर्यतचा सम अश्युअर्ड घेऊ शकतात. ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणुकदाराला प्रिमियमम आपल्या सुविधेनुसार निवडता येतो.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेत १९ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकते. ही एक प्रकारची विमा योजना आहे.
या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम १०,००० रुपये आहे.
याशिवाय कमाल विमा रक्कम १० लाख रुपये आहे.
या योजनेचा प्रीमियम तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरू शकता.
याशिवाय प्रीमियम पेमेंटवर ३० दिवसांची सूट मिळते.
३१ ते ३५ लाख रुपयांपर्यतचा मिळतो फायदा.
मॅच्युरिटीला मिळवा ३५ लाख रुपये
जर तुम्ही या योजनेत १९ वर्षे वयापासून गुंतवणूक सुरू केली आणि १० लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर ५५ वर्षांपर्यतसाठी तुमचा मासिक प्रीमियम १,५१५ रुपये, ५८ वयासाठी १,४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १,४११ रुपये असणार आहे.
५५ वर्षांसाठी ३१.६० लाख रुपयांचा फायदा मॅच्युरिटीच्यावेळेस मिळेल.
५८ वर्षांसाठी ३३.४० लाख रुपयांचा फायदा मॅच्युरिटीच्यावेळेस मिळेल.
६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपयांचा फायदा मॅच्युरिटीच्यावेळेस मिळेल.
या शिवाय ग्राहक ३ वर्षांनंतर पॉलिसी सरेंडरदेखील करू शकतात. ही पॉलिसी इंडियो पोस्टमधून घेता येते. यामध्ये ग्राहकांना बोनसचा फायदादेखील मिळतो. पोस्ट ऑफिसने अलीकडच्या काळात आपल्या अनेक सुविधा ऑनलाइन स्वरुपातदेखील उपलब्ध करून दिल्या आहेत.