जळगाव (प्रतिनिधी) संपुर्ण गिरणा कालवा प्रणालीसाठी विशेष दुरूस्तीचा प्रस्ताव ERM (extension, renovation, Modernozation) या केंद्र शासनाच्या योजनेनूसार सादर करण्याच्या सुचनेसह वरखेडे लोंढे बॅरेज बंदिस्त कालवा, तामसवाडी पुनर्वसन प्रक्रिया, सात बलून बंधाऱ्यांच्या पर्यावरण मान्यता प्रस्ताव सात बलुन बंधाऱ्यांना गुंतवणूक प्रमाणपत्र प्रस्ताव, निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. अडचण असेल तेथे माझ्याशी संपर्क करून चर्चा करा मात्र लवकरात लवकर प्रस्तावीत सिंचन प्रकल्पाची कामे मार्गी लावा, असे आदेश वजा सुचना आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्या आहेत.
आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या आदेशाने तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव मुख्य कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाचा विभागवार आढावा संबधित अधिकाऱ्यांनी सादर केला. प्रामुख्याने वरखेडे लोंढे प्रकल्पावर प्रस्तावित बंदिस्त कालव्याच्या कामाला गती द्यावी, त्याचप्रमाणे तामसवाडी पुनर्वसनासाठी आठ दिवसात बैठक बोलावून त्यावर तोडगा काढावा, सात बलुन बंधारे गुंतवणूक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा. त्याचप्रमाणे तापी प्रकल्पाला पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करावा याबाबत प्रस्तावाचा पाठपुरावा करून जेथे अडचण येत आहे अशा प्रसंगी माझ्याशी चर्चा करा. तसेच पंधरा दिवसात झालेल्या कार्यवाहीची माहीती मला कळवा जेथे माझी मदत लागत असेल त्या बाबत माझ्याशी चर्चा करा अशा सूचना वजा आदेश आज खासदार उन्मेशदादा पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आज तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयातील सभागृहात खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला ज. द. बोरकर (मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव) य.का. भदाणे (अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव) श्रीकांत दळवी(अधीक्षक अभियंता, गिरणा कडा, जळगाव) पी.आर. पाटील (कंत्राटदाराचे प्रकल्प तांत्रिक सल्लागार, जळगाव) संतोष भोसले (कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, जळगाव) यशोदीप कडलग ( कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन बांधकाम विभाग, जळगाव) मुकुंद चौधरी (कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प विभाग अमळनेर), वैशाली ठाकरे (कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जळगाव) देवेंद्र अग्रवाल (कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव) ईश्वर पढार( कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ) कामेश पाटील (उप अभियंता वरखेडे प्रकल्प), आरेखक सचिन पाटील, सेवानिवृत्त अभियंता आर डी पाटील ढोमणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला तापी पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता बोरकर यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
सात बलून बंधाऱ्यांच्या पर्यावरण मान्यता बाबत खासदारांच्या विशेष सूचना
गिरणा खोरे समृद्ध करणारे आणि साडे चार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणारे सात बलून बंधारे लवकरात लवकर साकारले जावे यासाठी निधी मिळण्यात महत्वाचा घटक असलेले सात बलून बंधाऱ्यांच्या पर्यावरण मान्यता बाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी विशेष सूचना दिल्या. गेल्या १३ सप्टेंबर २०२० रोजी जलशक्तीमंत्री ना. गजेंद्रसिंग शेखावत यांच्या सोबत व्ही. डी. ओ. कॉन्फरन्सच्या माध्यमातुन सात बलुन बंधाराचे सद्यस्थितीचे सादरीकरण जळगाव येथून करण्यात आले होते. निधि मिळण्यासाठी तातडीने सात बलून बंधाऱ्यांच्या पर्यावरण मान्यताबाबत पाठपुरावा करण्यासाठी प्रस्ताव तयार करून मार्गी लावा अशी सुचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मुख्य अभियंता ज द बोरकर यांना दिल्या.