सावदा (प्रतिनिधी) परिसरातील चिनावल गावात केळीवर तणनाशक फवारणी करून शेतकऱ्याचे ३ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, चंद्रकांत चुडामण पाटील (वय ५५, रा. चिनावल ता. रावेर) यांनी आपल्या चिनावल शिवारात कोचुर रस्त्याजवळ शेतगट नं ४४० मध्ये केळी लावलेली आहे. अज्ञात माथेफिरूने दि.२ ते ६ जानेवारीच्या दरम्यान, शेतातील १५०० ते १६०० केळी घडांवर २४ D तणनाशकाची फवारणी केल्याने केळी पिकाचे नुकसान केले. यामुळे चंद्रकांत पाटील यांचे साधारण ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात माथेफिरूविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.