भोपाळ (वृत्तसंस्था) ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं, असे वादग्रस्त वक्तव्य करत भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केला.
मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे विधान केलं आहे. कार्यक्रमात बोलताना खासदार ठाकूर म्हणाल्या,” क्षत्रियाला क्षत्रिय म्हटलं, तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटलं की, वाईट वाटतं. कारण काय आहे? तर समजू शकत नाही,” असं विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार, असा सवाल साध्वी प्रज्ञा यांनी उपस्थित केला.