पुणे (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सागर बर्वे (३४) याला पुण्यातून अटक करण्यात आली. तो आयटी इंजिनिअर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवारांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू अशी धमकी देण्यात आली होती. तर अमरावती येथील सौरभ पिंपळकर या भाजप कार्यकर्त्यांच्या ट्विटवरून पवारांची औरंगजेबाशी तुलना करून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. खासदर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे त्याची तक्रार केली होती.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपास सुरु केरा होता. तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे हा चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच दिवशी खासदार संजय राउत यांनाही फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी दोघांना दिवशी अटक केली होती. दरम्यान, सागर बर्वे याला न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.