पाचोरा (प्रतिनिधी) ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, अशा आशयाचे लव्ह लेटर अल्पवयीन मुलीला देणं एका तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून प्रवीण उर्फ सोन्या बापू गरुड (वय १९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रवीण उर्फ सोन्या याने अल्पवयीन मुलीचा ऑक्टोवर २०२१ ते आज पावेतो शाळेत व ट्युशनला जाताना तिचा पाठलाग केला. तसेच दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिडीत मुलीच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिला त्याच्या मोटार सायकलवर बसवून घरी घेऊन गेला. तर यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये ती सज्ञान नसल्याचे माहित असूनही चिठ्ठी देवुन त्यात ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, असा आशयाचा मजकुर लिहून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहेत.