मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ‘जय महाराष्ट्र’ असे म्हटल्याने त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तब्बल ३५ आमदार असून ते आज अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा आहे. पत्रकार परिषद घेण्याआधीच त्यांनी द्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जय महाराष्ट्र असे म्हटले आहे. यामुळे आता ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याचे मानले जात आहे. विशेष करून शिवसेनेने बोलणी सुरू केली असतांनाच हे ट्विट करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.